Punjab State Deer Baisakhi Bumper Lottery 2024 Result

Punjab State Dear Baisakhi Bumper Lottery Result Date: पंजाबमध्ये डियर बैसाखी बंपर लॉटरी 2024 चे निकाल (Punjab State Dear Baisakhi Bumper Lottery Result) घोषित केले जातील. पंजाब राज्य लॉटरी विभागाकडून शनिवारी, 20 एप्रिल रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. ज्यांनी या लॉटरीत भाग घेतला आहे ते पंजाब स्टेट लॉटरी punjabstatelotteries.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

याशिवाय, लॉटरीचे निकाल पंजाब राज्य लॉटरीच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. सायंकाळी 6 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे.

असा पहा निकाल -

  • 1. पंजाब स्टेट लॉटरीचे निकाल पाहण्यासाठी punjabstatelotteries.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • 2. "लॉटरी निकाल शोधा" पर्यायावर क्लिक करा.
  • 3. तुमचा तिकीट क्रमांक प्रविष्ट करा.
  • 4. ड्रॉप-डाउन मेनूमधून "बंपर" आणि "पंजाब राज्य डियर बैसाखी" पर्याय निवडा.
  • 5. "सर्च" पर्यायावर क्लिक करा.
  • 6. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

बक्षीस रक्कम -

  • प्रथम पारितोषिक: रु. 5 कोटी (दोन विजेत्यांमध्ये प्रत्येकी 2.5 कोटी)
  • द्वितीय पारितोषिकः 1 कोटी रुपये
  • तिसरे पारितोषिक: 50 लाख रुपये

पुरस्कार विजेत्यांसाठी महत्वाची माहिती -

कृपया पंजाब सरकारच्या राजपत्र अधिसूचनेवरून तुमच्या निकालांची पुष्टी करा. विजयी तिकीट आणि अर्ज 30 दिवसांच्या आत पंजाब राज्य लॉटरी संचालनालयाच्या कार्यालयात सबमिट करा. तसेच बंपर लॉटरीच्या तिकिटाची किंमत 200 रुपये होती, त्यात शिपिंग आणि हाताळणीसाठी अतिरिक्त 90 रुपये आकारण्यात आले होते.