Bhaubeej 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

संपूर्ण देशात आज भाऊबीजचा (Bhaubeej 2020) सण साजरा केला जात आहे. भाऊबीज हा दिवाळीमधील शेवटचा सण आहे. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सर्व जनतेला भाऊबीजनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आज गुजराती नववर्षाच्यादेखील शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊबीज मोठ्या श्रद्धा आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो. रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या आपुलकीला समर्पित केलेला दुसरा सण आहे. मात्र, देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रत्येक सण आणि उत्सव सरकारच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागत आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहेत. ज्या एका ट्विटमध्ये त्यांनी भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, दुसरे ट्विट त्यांनी गुजराती भाषेत केले आहे. ज्यात त्यांनी गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "नवीन वर्षाच्या शुभेच्छा ..... सर्व गुजराती बंधू-भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी तुम्हाला नवीन वर्षाच्या निरोगी, समृद्ध आणि आनंदी जीवनाची शुभेच्छा देतो", जगभरातील गुजराती समुदाय आज नवीन वर्षाचा दिवस साजरा करीत आहे. गुजराती दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष कार्तिक महिन्याच्या पहिल्या तारखेला साजरे केले जाते. हे देखील वाचा- Akhilesh Yadav On Alliance: समाजवादी पार्टी कोणासोबत करणार आघाडी? अखिलेश यादव यांचे स्पष्ट संकेत

नरेंद्र मोदी यांचे ट्विट-

तसेच, नरेंद्र मोदी सोमवार हे आज जैन भिक्षु आचार्य विजय वल्लभ सूरीश्वर जी महाराज यांच्या 151वी जयंती निमित्त स्टॅचू ऑफ पीस चे अनावरण करणार आहेत. हा पुतळा जैतपूरा येथील विजय वल्लभ साधना केंद्रात स्थित आहे. या पुतळ्याची उंची 27 फूट आहे. तर, या पुतळ्याचे वजन 1 हजार 300 किलो आहे. नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 12.30 वाजता या पुतळ्याचे लोकार्पण करणार आहे.