PM Modi Serve Langar at Gurudwara: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान सोमवारी पहाटे शीख पगडी घालून पटना साहिब गुरुद्वारा (Patna Sahib Gurudwara) त पोहोचले. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोके टेकवून रांगेत बसलेल्या लोकांना लंगरची सेवा दिली. पंतप्रधान लोकांना लंगर देत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Arvind Kejriwal Bail: 'आप'च्या विद्यार्थी युवा संघर्ष समितीकडून 'जेल का जवाब वोट से' सायक्लोथॉनचे आयोजन, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती (Watch Video))
पटना साहिब गुरुद्वारातून पंतप्रधान मोदी थेट हाजीपूरला रवाना होणा आहेत. जिथे जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर ते चिराग पासवान यांच्या प्रचारासाठी हजेरी लावतील. पंतप्रधान मोदींनी रविवारी पाटण्यात रोड शो केला. रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.
PM performs Seva at Patnasahib Gurudwara @PMOIndia pic.twitter.com/Razq39aCjz
— Poulomi Saha (@PoulomiMSaha) May 13, 2024