Arvind Kejriwal Bail: आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party)च्या विद्यार्थी युवा संघर्ष समिती (Yuva Sangharsh Committee)च्यावतीने दिल्लीत सायक्लेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाला (Arvind Kejriwal Bail) आहे. त्याच्या समर्थनात दिल्लीत विद्यार्थी युवा संघर्ष समितीच्यावतीने सायक्लेथॉनचे आयोजन केले गेले. यावेळी शेकडो विद्यार्थायंनी यात त्यांच्या सहभाग नोंदवला. सायकलवर अरविंद केजरीवाल यांचे झेंडे घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. 'जेल का जवाब वोट से' असं म्हणत मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावर उतरल्याचे दिसले. (हेही वाचा:Arvind Kejriwal Get Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातून 'या' तारखेपर्यंत जामीन मंजूर )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)