Bareilly Shocker: उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) येथे एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गँगरेपनंतर तीन महिन्यांच्या गर्भाचा पोटात मृत्यू झाला. न्यायासाठी पीडितेने डब्यात गर्भ घेऊन एसएसपी कार्यालय गाठले. महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना 13 सप्टेंबर रोजी घडली होती. तीन नराधमांनी पीडितेवर बलात्कार केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसएसपीने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
आरोपींनी तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ही महिला कामासाठी शेतात गेली असताना ही घटना घडली. यावेळी गावातील गुंडांनी महिलेवर बलात्कार केला. हे प्रकरण पोलीस ठाणे बिशरत गंज परिसरातील आहे. (हेही वाचा - Wipro Fires Employees: Wipro ने Moonlighting च्या पार्श्वभूमीवर 300 कर्मचाऱ्यांना कामावरून टाकले काढून; कंपनीतील नोकरीसोबतच करत होते इतर काम)
बलात्कारानंतर आरोपी महिलेला तिथेच सोडून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, बराच वेळ पीडित मुलगी घरी न पोहोचल्याने कुटुंबातील सदस्य तिला शेतात पाहण्यासाठी आले. यावेळी पीडिता गंभीर अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी महिलेला खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी बाळाचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांना केवळ पीडितेला वाचवण्यात यश आलं.
दरम्यान, डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले की, बलात्कारादरम्यान महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकारानंतर न्यायासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.