Prashant Kishor यांच्या West Bengal Election Results 2021 बाबतच्या भविष्यवाणीचं काय होणार? कलांनुसार TMC 200  पार, BJP चं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगणार
Prashant Kishor | (Photo Credits: Facebook)

पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसर्‍यांदा आपलं सरकार स्थापन करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहेत. नंदिग्राम विधानसभा मतदार संघात शुभेंदू अधिकारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या पक्षाचा विजय मोठा आहे. दुसरीकडे भाजपा ने देखील मागील निवडणूकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांचा 200 पारचा दावा खोटा ठरला आहे. सध्या निवडणूक आयोगने दिलेल्या कलांच्या आधारे तृणमूल कॉंग्रेस पक्षाकडे 200 पेक्षा जास्त जागा आहेत. बंगाल मधील या विधानसभा निवडणूक निकालामध्ये अनेकांना आज 'प्रशांत किशोर' यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीची नक्कीच आठवण झाली आहे. Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य म्हणाले 'राजकीय रणनितीकार म्हणून यापुढे काम करणार नाही'.

राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पश्चिम बंगालच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठे वक्तव्य केले होते. आज त्याचीच प्रचिती आली आहे. त्यांनि केलेल्या दाव्यानुसार, भाजपा पश्चिम बंगाल मध्ये 2 अंकी आकडा पार करणं कठीण आहे. त्यांनी चांगली कामगिरी केल्यास ट्वीटर सोडून देण्याचं चॅलेंज दिले होते.

प्रशांत किशोर यांचं ट्वीट

पश्चिम बंगाल निवडणूकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रशांत किशोर हे रणनितीकार म्हणून काम करत होते. त्यांनी बंगाल मध्ये भाजपाची 'हवा' असण्यामागे मीडीयाच्या काही वर्गाचा हात असल्याचं म्हटलं आहे. भाजपाचं समर्थन असलेल्या एका वर्गाने ही हवा बनवली आहे. सत्य तर हे आहे की बंगाल मध्ये भाजपला दोन अंकी आकडा जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे असे त्यांनी म्हटलं आहे.