Prashant Kishor:  प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य म्हणाले 'राजकीय रणनितीकार म्हणून यापुढे काम करणार नाही'
Prashant Kishor | (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Political Strategist Prashant Kishor) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी रणनिती कार म्हणून काम केले होते. किशोरी यांची रणनिती कामी आल्याचे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावरुन स्पष्ट होते आहे. या निकालामुळे प्रशांत किशोर यांच्या रणनितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी प्रशांत किशोर यांनी मात्र यापूढे राजकीय रणनिती (Political Strategist) ठरविण्यापासून संन्यास घ्याचे ठरवल्याचे दिसते. प्रशांत किशोर यांनी यांनी तसे वक्तव्य केले आहे. किशोर यांनी आपण यापुढे राजकीय रणनिती ठरवणार नाही आहोत. हे काम करण्यापासून आपण स्वत:ला वेगळे करत असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांची ही सर्वात मोठी घोषणा मानली जात आहे.

प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना ही घोषणा केली आहे. किशोर यांनी म्हटले आहे की, राजकीय रणनितीकाराचे काम ते आता सोडत आहेत. येणाऱ्या काळात ते हे काम करणार नाहीत. परंतू, राजकीय रणनितीकार म्हणून काम करणे थांबवल्यानंतर पुढे काय करणार याबाबत मात्र प्रशांत किशोर यांनी मौन बाळगले आहे. प्रशांत किशोर यांनी भविष्यातील आखणीबातचे पत्ते मात्र उघडले नाहीत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवला आहे. ममतांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा आहे. प्रशांत यांची रणनिती ममता बॅनर्जी यांच्या कामी आली. ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे. इतकेच नव्हे तर प्रशांत किशोर यांनी केलेले भाकीतही खरे ठरताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पपक्षाला 100 पेक्षाही कमी जागा येतील. जर भाजपला 100 पेक्षा अधिक जागा आल्या तर मी राजकीय रणनितीकार म्हणून काम करणे सोडेन असे ते म्हणाले होते. किशोर यांचे भाकीत खरे ठरले भाजपला 100 पेक्षाही कमी जागा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Mamata Banerjee Political Career: ममता बॅनर्जी यांचा संघर्ष, राजकारण आणि सत्ता)

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर हे भारतीय राजकारणातील अलिकडील काळातील रणनितीकार म्हणून ओळखले जातात. प्रामुख्याने लोकसभा निवडणूक 2014 मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी रणनिती आखली होती. ही रणनिती कामी आली होती. भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर विजयी झाला. दरम्यान, सप्टेंबर 2018 मध्ये जनता दल (युनायटेड) मध्ये सहभागी झाले. 29 जानेवारी 202 या दिवशी त्यांनी जदयू प्रमुख नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. नितीश कुमार यांनी नागरिकता दुरुस्ती कायद्याचे समर्थन केले होते. त्यावरुन किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. अखेर नितीश यांनी किशोर यांना पक्षातून काढून टाकले.