मोदी सरकारची Expiry Date संपली, ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल
ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य- ANI)

कोलकाता (Kolkata) येथे शनिवारी (19 जानेवारी) विरोधी पक्षांची महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकार आणि भाजप (BJP) वर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार  तुमची 'एक्सापायरी डेट' (Expiry Date) संपली असे म्हणत टीका केली आहे. येत्या आगामी निवडणूकीसाठी सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान पदासाठी कोण बाजी मारणार यावर ही चर्चा करणार आहोत. परंतु भाजप आणि मोदी सरकार यांचा निवडणुकीत पराभव व्हावा हेच आमचे ध्येय असल्याचे म्हटले आहे. सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) कडून विरोधी पक्षांवर कारवाई करण्यात येत आहे.

मोदी सरकार आणि भाजपने कोणालाच सोडले नसल्याने त्यांच्यावर सर्व बाजूने टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप सोबत आहेत ते चांगले आणि ज्यांनी साथ सोडली ते चोर अशी भावना भाजपची असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. परंतु सध्याच्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कोण सोडवणार अशी बोचरे शब्द मोदी सरकारले सुनावले आहेत.( हेही वाचा-विरोधी पक्षांचे एकत्रिकरण हे माझ्या नाही देशातील जनतेच्या विरोधात- नरेंद्र मोदी )

महाआघाडीटा नेता कोण असणार याबबात भाजप प्रश्न विचारत आहे. परंतु आमचा नेत कोण असेल त्याबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. तर भाजपमध्ये पंतप्रधान आणि अध्यक्ष दिसतात. मात्र इतर नेते कोठे गेले असा सवाल ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे महाआघाडीचा नेता आणि पंतप्रधान कोण असणार हा मुख्य प्रश्न नसून भाजप आणि मोदी सरकारचा पराभव हेच ध्येय असल्याने सत्तेतून गेल्यावर महाआघाडी बाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.