राज ठाकरे व्यंगचित्र (फोटो सौजन्य- ट्वीटर)

राजकीय घडामोडींवर नेहमीच व्यंगचित्रातून भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा मकरसंक्रात निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी नव्या थापा असलेले पतंग उडवताना दिसत आहे. तसेच 10 टक्के सवर्ण यांना लागू केलेल्या आरक्षण बद्दल हे पतंग असून मोदींनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांच्या पतंगा खाली पडल्या असल्याचे व्यंगचित्रातून रेखाटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात आर्थिक दृष्ट्या मागास सवर्ण यांना आरक्षण देऊ करण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर संसदेत लगेच याबाबत विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र घटनातज्ज्ञांनी हे आरक्षण टीकणार नाही असे मत व्यक्त केले आहे. या मुद्द्यावरुनच राज ठाकरे यांनी निशाणा साधत मोदींवर टीका केली आहे. तर अमित शहा (Amit Shah) हे काही मीडियासोबत पतंगबाजी करताना दिसत आहे. परंतु गच्चीमध्ये उभ्या असलेल्या भाजप (BJP) लिहिलेल्या व्यक्तीने या सर्वाकडे पाठ फिरवली आहे.(हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वर्मा' प्रकरणावर व्यंगचित्रातून राज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला)

या व्यंगचित्रातून 'नव्या थापा- 10% आरक्षण' या पतंगासह जुन्या आश्वासनांची पतंगे अशीच जमिनीवर खितपत पडली आहेत. या पडलेल्या पतंगावर स्वच्छ भारत, जीएसटी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दर, परदेशी काळा पैसा, मेक इन इंडिया आणि नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी असे शब्दांकन पतंगावर करण्यात आलेले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी थापा मारतात असा टोला राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून मोदी सरकारला लगावला आहे.