पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वर्मा' प्रकरणावर व्यंगचित्रातून राज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला
राज ठाकरे व्यंगचित्र (फोटो सौजन्य- ट्वीटर)

सीबीआय माजी संचालक आलोक वर्मा (Alok Verma) यांना अवघ्या 48 तासाच्या आतमध्ये पदावरुन हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबबात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडून हा निर्णय 2-1 अशा बहुमाताने मंजूर झाला होता. मात्र राजकीय घडामोडींवर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा मोदींच्या वर्मांवर बोट ठेवले आहे. तसेच राज ठाकरे यांनी या वेळच्या व्यंगचित्रातून एकाच वेळी दोन राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.

या व्यंगचित्रातून आलोक वर्मा प्रकरणी अघोषित आणीबाणीवरुन मोदी सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे हे व्यंगचित्र भाजप पक्षाला चांगलाच टोला देणारे ठरणार आहे. आलोक वर्मा प्रकरणी सीबीआय संचालक पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर वर्मा यांच्याकडे युक्ती फायर सर्व्हिस अँड होम गार्डच्या महासंचालक पद देऊ केले होते. मात्र या पदाचा स्विकार न करता वर्मा यांनी अखेर राजीनामा दिला. त्यामुळेच राज ठाकरे यांनी वर्माप्रकरणी बोचक शब्दात व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली.( हेही वाचा- मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून फटकारे)

वर्मा प्रकरणी व्यंगचित्राला 'हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला' असे शीर्षक देण्यात आले आहे. तर नरेंद्र मोदी खड्डा तयार करत असल्याचे दिसत आहे. या खड्ड्याला 'संशय' या नावाने संबोधले आहे. खड्ड्याच्या बाजूला आलोक वर्मा यांचा मृतदेह दाखविण्यात आला आहे. सुजाण नागरिक मोदींना तुम्ही खड्ड्यात कशाला असा प्रश्न विचारत आहे.

तर दुसऱ्या व्यंगचित्रात नयनतारा सहगल (Nayantara Sahgal) यांच्या प्रकरणावरुन सरकारवर टीका करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे आणीबाणीची आठवण झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. या व्यंगचित्रात एक गायिका तंबोरा घेऊन राग गाण्यासाठी बसल्या आहेत. तर पोलिसांकडून, आपण आज कोणता राग गाणार आहात? अशी विचारणी करण्यात आलेली आहे.