आलोक वर्मा (Photo credits: PTI)

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा (Alok Verma) यांना अवघ्या 48 तासाच्या आत पदावरुन हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आलोक वर्मा यांच्याकडे युक्ती फायर सर्व्हिस अँड होम गार्डच्या महासंचालक पद देऊ केले होते. अखेर शुक्रवारी (11 जानेवारी ) आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला आहे.

मोदी सरकारकडून आलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच निवड समितीकडून 2-1 अशा बहुमताने निर्णय घेण्यात आला होता. मात्र आलोक वर्मा यांच्या बचावासाठी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना पाठिंबा दाखविला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आलोक वर्मा यांनी बुधवारी पुन्हा कार्यपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर लगेच काव यांनी या दोन महिन्यांच्या काळात केलेल्या बदल्या त्यांनी रद्द केल्या होत्या. (हेही वाचा-सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची 'या' कारणांमुळे हकालपट्टी)

तर आलोक वर्मा आणि सीबीआय विशेष संचालक राकेश आस्थाना यांच्यामधील वादामुळे वर्मा यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार होते. मात्र वर्मांच्या रजेवर सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांचा रजेवरील आदेश रद्द करण्यात आला होता.