मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून फटकारे
RajThackeray (File Photo)

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) एएनआयला (ANI) खास मुलाखत दिली. या मोदीमय मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यंगचित्रातून ताशेरे ओढले आहेत. 'एक मनमोकळी मुलाखत!' असे या चित्राला नाव देण्यात आले आहे. यात दोन्ही खुर्च्यांवर मोदीच बसलेले दिसतायेत. याचाच अर्थ मोदीच स्वतःची मुलाखत घेत आहेत. यावेळी स्वतःची मुलाखत घेत "बोला काय विचारु?" असा प्रश्न विचारत असल्याचे चित्रात दाखविण्यात आले आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही मोदी सरकार बेकार- राज ठाकरे

एएनआयच्या संपादिका स्मिता प्रकाश (Smita Prakash) यांनी तब्बल 95 मिनिटे मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींनी अनेक विषयांवर भाष्य केले. नोटाबंदी, जीएसटी, काळा पैसा, गांधींचं राजकारण, उर्जित पटेल राजिनामा, विधानसभा निवडणूकीत भाजपचा झालेला पराभव या विषयांवर मोदी मोकळेपणाने बोलले. मात्र या मुलाखतीतील प्रश्न पूर्वनियोजित होते, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.

मीपणा सिद्ध करण्यासाठी या मुलाखतीचे आयोजन केले होते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनेही मोदींवर टिकास्त्र सोडले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या आपल्या खास शैलीत मोदी मुलाखतीचा समाचार घेतला आहे.