मोदींवरील जनतेचा राग तीन राज्यांतील त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष कधीच जिंकत नसतो तर सत्ताधारी हारत असतात आणि लोकसभा निवडणूकीतही मोदी सरकारचे धोरण भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरेल, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही मोदी सरकार बेकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर कॉम्प्यूटर किंवा मोबाईलमधील डेटा, माहितीच्या छाननीचे अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी दिला. यावरुन राज ठाकरे यांनी तीव्र आपेक्ष नोंदवला. मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचं असेल तर पाहावं. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल, आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूका जशा जवळ येतील तसं मोदी सरकारच्या चुकांचं प्रमाण वाढेल, असेही ते म्हणाले. तसंच नोटाबंदी करुन त्यांनी स्वतःसाठी मोठा खड्डा खणला, अशी टीकाही यावेळी राज ठाकरे यांनी केली.
लोकसभा व विधानसभा निवडणूक एकाच वेळी होणे अशक्य असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे. "भाजप एकाचवेळी फावडे आणि कुऱ्हाड स्वत:च्या पायावर मारून घेणार नाही. आधी फावडं मारून घेतील मग कुऱ्हाड," असं राज ठाकरे म्हणाले. तसंच जानेवारीमध्ये पुन्हा एकदा नाशिक दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री ऐकत नाहीत? त्यांना कांद्याने हाणा! राज ठाकरे यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला
मोदींना अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देणार का? असा गमतीशीर प्रश्न विचारला असता राज ठाकरेनेंही त्यांच्या शैलीत उत्तर देत म्हटले की, "त्यांच्या लग्नावर विश्वास आहे का?"