पाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे
राज ठाकरे

Assembly Elections Results 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi आणि भाजपचे (BJP) वर्तन ज्या पद्धीतीने गेल्या काही काळात बदलत होते त्याचे असे परिणाम होणारच होते. आज भाजप पराभूत झाला असला तरी, पहिल्यांदा गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करायला हवे. कारण, मोदी, शाहांना (Amit Shah) त्यांच्या घरच्या मैदानात जागा गुजराती जनतेनेच दाखवली. त्यानंतर कर्नाटकच्या जनतेने जागा दाखवली आणि आता तर या पाचही राज्यांमध्ये भाजपचा थेट पराभवच झाला. या पाचही राज्यांच्या निकालातून देशभरातील जनतेची नाराजीच प्रकट झाली, अशी प्रतिक्राय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यात भाजपचा सपाटून पराभव झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजप सत्तेत आला पण काहीच केले नाही. त्यामुळे विकासाच्या पातळीवर यांच्याकडे मुद्देच नाहीत. म्हणूनच राम मंदिर वैगेरेंसारखे काहीतरी भावनीक मुद्दे काढायचे आणि वातावरण तापवत ठेवायचे. दुसरा काही उद्योगच यांना जमत नाही. महाराष्ट्रातही फडणवीस सरकारला गांभीर्य नाही. राज्यात भीषण दुष्कळ पडत असताना महाराष्ट्र सरकारला त्याचे काहीच पडले नाही. कृषीमंत्री पांडूरंग पुंडकर यांचे निधन झाले त्यानंतर यांना कृषीमंत्रीच मिळाला नाही. राज्याला आज कृषीमंत्रीच नाही. कोणातरी एका मंत्र्याकडे त्याचा अतिरिक्त कारभार आहे.

सुरुवातीच्या काळात हे राहुल गांधी यांना पप्पू म्हणत होते. पण, आता त्यांनी त्यांना पप्पू म्हणने बंद केले. आता राहुल गांधी म्हणजे परमपूज्य झाले आहेत. या पाच राज्यांमध्ये भाजपचा झालेला पराभव म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला मिळालेली चपराकच आहे. या पराभवतून केवळ मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरामच्याच नव्हे तर, देशभरातील जनतेची नाराजी प्रकट झाली आहे असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिलाला राजीनामा हे सुद्धा केंद्र सरकारच्या कारभाराचेच द्वेतक आहे. उर्जित पटेलांचा राजीनामा हा केवळ साधा राजीनामा नाही. त्यांनी कोणत्यातरी मोठ्या धोक्याच्या आधी राजीनामा दिला असण्याची दाट शक्यता आहे, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.