Vinayak Mete on Devendra Fadnavis : ‘....तरी आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं!’
Vinayak Mete (Photo Credits: FB)

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात (Maharashtra) जे काही राजकीय नाट्य घडलं त्यानंतर देवेंद्र फडणवीसचं (Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री होतील असं संपूर्ण राज्यातील जनतेला वाटत होतं पण अचानक बाजी पलटली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) नाव पुढे आलं. राज्यातील जनतेसह राजकीय वर्तुळातून यावर बऱ्याचं क्रिया प्रतिक्रिया ऐकायला आल्या. शिवसेनेसह भाजपा कार्यकर्त्यांना देखील हा आश्चर्याचा धक्का होता. तरी आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं अशी प्रतिक्रीया आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या (Birthday) दिवशी दिली आहे.

 

मुंबईतील (Mumbai) वाय.बी. चव्हाण (Y B Chavan) केंद्रात विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रवीण दरेकर (Pravin Darekar) उपस्थित होते. वाढदिवशी मनोगत व्यक्त करताना विनायक मेटे म्हणाले, मला देवेंद्र फडणवीसांबद्दल खात्री असून आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री आहेत, असं विनायक मेटे म्हणाले. तसेच तुम्ही सरकारमध्ये घेण्याचा शब्द दिला होता पण शब्द जरी पाळला नसला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा मिश्कील टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे. (हे ही वाचा:-Devendra Fadnavis on Disale Guruji: ग्लोबल पुरस्कार विजेते डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल)

 

दरम्यान विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मेटे म्हणालेत, मी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chawan) यांनी त्या संबंधीत दखल घेतली नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. मागील सरकारने समाजाला न्याय दिला नाही. ओबीसी समाजाचं राजकीय (OBC Reservation) आरक्षण यांनी घालवलं. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम मागील सरकारने  केला असल्याची विनायक टीका मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.