Devendra Fadnavis on Disale Guruji: ग्लोबल पुरस्कार विजेते डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल
रणजितसिंह डिसले गुरुजी (PC - ANI)

ग्लोबल पुरस्कार विजेते (Global Award Winner) डिसले गुरुजी (Disale Guruji) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. डिसले गुरुजींची विभागीय चौकशी सुरु असुन त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जवळपास दोन वर्ष दहा महिने कामावर हजर न राहता डिसले गुरुजी यांनी शासनाकडून पगार घेतल्याचा आरोप शिक्षक रणजितसिंह डिसलेवर आहेत. तरी या प्रकरणानंतर शिक्षक रणजितसिंह डिसले राजीनामा (Resignation) देणार आहेत. तत्पूर्वी संबंधीत प्रकरणी आज डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे  आणि आपली बाजू त्यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.

 

शिक्षणाधिकारी किरण लोहार (Education Officer Kiran Lahore) यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कारवाई होण्या अगोदर रणजितसिंह डिसले (Ranjeet Singh Disale) यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. तसेच दोन वर्ष दहा महिने कामावर गैरहजर असुन डिसले गुरुजींनी घेतलेला पगार त्यांच्या कडून वसूल करण्यात येणार आहे. (हे ही वाचा:-Maharashtra Cabinet Expansion: सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, आमदार दीपक केसरकर यांची माहिती)

 

डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारने गौरविलेल्या शिक्षकावर अन्याय होईल, असा कोणताच निर्णय घेणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल आहे. डिसले गुरुजींचं म्हणणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ऐकून घेतलं आहे. त्यांच्यावर अन्याय होईल असं पाऊल उचलणार नाही, असं स्पष्ट केलेलं आहे.