शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( फोटो सौजन्य - ट्विटर )

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पवित्र अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. तर फैजाबाद विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना नेते, शिवसैनिक यावेळी हजर झाले. तसेच अयोध्यानगरीत उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरीवरील मातीचा कलश घेऊन त्यांनी आयोध्येत प्रस्थान केले आहे. तर संपूर्ण रामनगरीत शिवसेनेचे 'हर हिंदू की यह पुकार, पहिले सरकार' असे होर्डिंग लावले गेले आहेत. तसेच 24 तास सातत्याने येथे कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाला एक विशिष्ट ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यादौऱ्यासाठी संतमहंत आणि अयोध्यावासियांकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. ( हेही वाचा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज होणार अयोध्येकडे प्रस्थान ) 

या दौऱ्यासाठी सर्व ठाकरे कुटुंबियांनी एकत्रपणे राजकीय सीमोल्लंघन केले असून ते आयोध्येत दाखल झाले आहेत. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यावेळी दिसून आले.