शिवसेना नागरिकत्त्व दुरूस्ती विधेयक 2016 ला संसदेमध्ये करणार विरोध
Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

Citizenship Amendment Bill:  नागरिकत्त्व दुरूस्ती विधेयक 2016 ( Citizenship Amendment Bill) ला शिवसेनादेखील संसदेमध्ये विरोध करणार असल्याची भूमिका आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली आहे. या निर्णयामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये कटुता वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम गण परिषदेचे (Asom Gana Parishad) नेते उद्धव ठाकरे यांना भेटले. केवळ हिंदू मुस्लिम हा वाद नाही. नागरिकत्त्व दुरूस्ती विधेयकामुळे आसाममधील सांस्कृतिक बदल होतील, आमच्या अस्मितेला धक्का लागेल असे सांगण्यात आले आहे.

आसाम आणि पुर्वेकडील विद्यार्थी परिषद, आसाम सरकारमधील सहयोगी पक्ष, यांनी आसाम गण परिषदेने नागरिकत्त्व दुरूस्ती विधेयक 2016 ला विरोध केला आहे. शिवसेना, कॉंग्रेस, जदयूसह इतर राजकीय पक्षांनीदेखील या विधेयकाला विरोध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधेयक संसदेत मांडणार असल्याची घोषणा केली आहे.