हरियाणा (Haryana) मधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) गेल्या काही दिवसांपासून राजकरणात येणार असल्याने चर्चेत आहे. तर रविवारी सपना हिने एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे ही म्हटले आहे. तर सपना चौधरी हिने भाजप पक्षाचे नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी भेट दिली असून त्यांच्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे सपना काँग्रेस ऐवजी आता भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सपना हिला काँग्रेस पक्षाकडून मथुरा येथून हेमा मालिनी यांच्याविरुद्ध निवडणुक लढवण्यासाठी तिकिट दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र मथुरा येथून महेश पाठक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सपना हिने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करुन काँग्रेस पक्षात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केल्याने तिच्या राजकीय पक्षातील प्रवेशाबद्दल परसलेल्या अफवामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या वृत्ताचे Sapna Chaudhary यांच्याकडून खंडण)
तर सोमवारी सपना हिने सोशल मीडियावर मनोज तिवारी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. परंतु हा फोटो रविवारी सपना हिने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता असे मानले जात आहे की, भाजपने सपना हिला हरियाणा मधील कोणत्याही जागेवर निवडणुक लढवण्यासाठी तिकिट दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सुपरस्टार सपना हिला भाजप पक्षाच्या जवळ आणण्यासाठी मनोज तिवारी यांचे योगदान असल्याचे ही म्हटले जात आहे.