Video: शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारादरम्यान आणि शिवस्वराज्य यात्रेच्या वेळीस एक दुर्घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी घेऊन जाणारी क्रेन बिघाडल्याची घटना घडली. क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि रोहिणी खडसे आणि अमोल कोल्हे होते. क्रेनमध्ये बिघाड होताच, वेळेवर त्यांना वाचवण्यात आले. क्रेनमधून खाली पडता पडता वाचले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार)
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणूकीसाठी जुन्नर मतदारसंघात सर्व राजकिय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दौरा सुरु असताना अचानक एक घटना घडली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी घेऊन जाणारी क्रेन मध्येच बिघाड झाली. क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि रोहिणी खडसे, मेहबुब शेख आणि डॉ. अमोल कोल्हे होते.
पाहा व्हिडिओ
माजी मंत्री जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, थरारक घटनेचा व्हिडिओ @Jayant_R_Patil @kolhe_amol @Rohini_khadse pic.twitter.com/ONhd7HB0Gm
— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) August 9, 2024
क्रेनमधूव खाली उतरताना, डॉ. अमोल कोल्हे हे कोरकोळ जखमी झाले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तिघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली. राजकिय नेत्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे दौरे सुरु होणार आहे.