वसुंधरा राजे (फोटो सौजन्य- ANI)

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव (Sharad Yadav) यांनी वसुंधरा राजे यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यावेळी त्यांनी वसुंधरा राजे (Vasundhara Raje)  यांना आराम द्या, थकल्या आहेत आणि खूप जाड झाल्या आहेत असे विधान केले आहे.

त्यामुळे वसुंधरा राजे यांनी शरद यादव यांच्यावर या वादग्रस्त विधानावरुन हल्लाबोल केला आहे. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले.

शरद यादव यांच्या वादग्रस्त विधानावरुन मला धक्का बसला. एवढा मोठा नेता महिलांबद्दल असे वक्तव्य करणे शोभत नसल्याचे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शरद यादव यांनी महिलांचा अपमान केल्याने वसुंधरा राजे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. राजस्थानमध्ये आज मतदानाला सुरुवात झाली असून झालरापालटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदान केले. त्यावेळी शरद यादव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर त्यांनी हल्लाबोल केला.

शरद यादव काय म्हणाले?

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरुद्ध शरद यादव यांनी वादग्रस्त विधान केले होते. प्रचारादरम्यान त्यांनी असे म्हटले की, वसुंधरा राजे जाड्या झाल्या असून त्यांना आराम देण्याची गरज आहे. त्यामुळे शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे.