Rajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय म्हणजे राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीला जनतेने दिलेली भेट आहे. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपच्या कारभाराला जनता त्रासली होती. सत्तापरिवर्तनाच्या रुपात राजस्थानच्या जनतेने भाजपच्या त्रासातून मुक्ती मिळवली असे सांगत राजस्थानमध्ये काँग्रेसचेच सरकार स्थापन होईल, असा आत्मविश्वास काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. राजस्थान विधानसभेसा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. या मतमोजणीनुसार राजस्थान विधानसभा निडणूक निकाल यायला लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेले सर्व कल काँग्रेसच्याच बाजूने आहेत. त्यामुळे राजस्थानात भाजप पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेस विजयी होणार अशी चिन्हे दिसत असतान सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राजस्थानमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला असता, या विषयावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया देता येणार नाही. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत पक्षाचे हायकमांड, ज्येष्ठ नेते, आमदार हे चर्चा करुन ठरवतील. मात्र, या विषयावर आज कोणतेही भाष्य करणे योग्य नाही. खरेतर आज आनंदाचा दिवस आहे. काँग्रेस, नेते कार्यकर्ते विजयाचा आनंद घेत आहेत. त्यांना विजयाचा आनंद घेऊ द्या. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात लवकरच मिळेल असेही सचिन पायलट म्हणाले. (हेही वाचा, राजस्थानमध्ये काँग्रेस शंभरीपार, भाजप 84 जागांवर आघाडीवर, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, या वेळी बोलताना राजस्थानात काँग्रेसला दिसत असलेला विजय कोणा एका व्यक्तिचा नाही. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि राजस्थानातील सर्व नेते कार्यकर्ते यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नाचेच हे फळ आहे. भाजपचा पराभव होणारच होता. कारण, भाजपच्या त्रासाला जनता कंटाळली होती. भाजपच्या शासन काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर प्रचंड अन्याय झाले. त्यामुळे जनता या निवडणुकीत अन्यायाविरोधात व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले, असेही सचिन पायलट म्हणाले.