Rajasthan Elections Results 2018: राजस्थान (Rajasthan) विधानसभा निवडणूक (Assembly Elections)निकालाबाबत हाती येत असलेले अंदाज भाजपसाठी अत्यंत धक्कादायक आहेत. भाजप हा राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्ष आहे. वसुंधरा राजे येथे मुख्यमंत्री आहेत. मात्र, राजस्थानच्या जनतेच्या मनात सत्तापरिवर्तनाचाव विचार असल्याचे सध्याचे कल सांगत आहेत. प्राप्त माहितीनुसार काँग्रेसने 100 पेक्षाही अधीक जागांवर आघाडी घेतली आहे. तर, भाजप 80ते 85 जागांवरच रेंगाळताना पाहायला मिळत आहे. एका जागेवर 1 अपक्ष आघाडीवर आहे.
काही मिनीटांपूर्वीच कल हाती आला तेव्हा, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा 25 जागांनी आघाडीवर होती. अद्याप कोणत्याही ठिकाणचा निकाल लागला नसून मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु झाली तेव्हा काहीच वेळात, भाजपने आघाडी घेतली. तर, पिछाडीवर होती. मात्र, काही काळात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. काँग्रेसने अल्पवधीतच मोठी आघाडी घेतली आणि आतापर्यंत ही आघाडी कायम ठेवली आहे. (हेही वाचा, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस फ्रंटवर भाजप बॅकफूटवर)
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये 230 जागांपैकी भाजप 106 जागांवर आघाडीवर आहेत तर, काँग्रेस 112 जागांवर आघाडीवर आहेत. 11 जागांवर इतर पक्ष आघाडीवर आहेत. छत्तीसगढमध्ये 90 जागांपैकी भाजप 23, काँग्रेस 58 इतर पक्ष 08 जगांवर आघाडीवर आहेत. तेलंगणातही एकूण 119 जगांवर टीआरएस 76, काँग्रेस+टीडीपी 30 जगांवर आघाडीवर आहे. तर भाजप केवळ 3 जगांवर आघाडी आहेत. इतर पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे.