Narendra Modi and Xi Jinping (Photo Credits- Twitter)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चीनसह अन्य देशांना त्याचा धोका उद्भवला आहे. तर चीन मध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृतांचा आकडा 800 वर पोहचला आहे. कोरोना झपाट्याने वाढत चालल्याने डब्लूएचओ (WHO) यांच्याकडून वैद्यकिय आणीबाणी सुद्धा लागू करण्यात आली होती. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार कोरोना व्हायरस प्रकरणी भारत चीनला मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हुबेई शहरात भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शी जिनपिंग यांच्या मदतीने मोदी यांनी प्रयत्न केले. तसेच कोरोना व्हायरसमुळे वाढत्या मृतांच्या आकडेवारीवर नरेंद्र मोदी यांनी दुख व्यक्त केले आहे. तर नवीन 327 हजार कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.

गेल्या आठवड्यात 640 भारतीय नागरिकांसोबत मालदीव येथील सात नागरिकांना ही एअर इंडियाच्या एका विशेष विमानाने भारतात आणले होते. चीन मधील वुहान शहरातून कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्याचे जाळे आता जगभरात पसरत चालले आहे. परराज्य मंत्री एस जयशंकर यांनी वुहान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर भारतीय दुतवासांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले होते.(कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 800 हून अधिक जणांचा मृत्यू, WHO चीनमध्ये पाठवणार विशेष पथक)

Tweet:

कोरोना व्हायरसचा धोका चीनसह अन्य 25 देशांना असल्याचे समोर आले आहे. यामध्ये भारत 17 वा क्रमांकावर असून दिल्ली विमानतळावर याच्या इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. बर्लिन येथे हम्बोल्ट युनिव्हर्सिटी आणि रॉबर कोच संस्थेचे संशोधक यांनी एका अभ्यासानुसार 30 देशातल्या सुचीमध्ये भारत 17 व्या स्थानावर असल्याचे सांगितले आहे.