पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडिया सोडण्याचा विचार, ट्वीट करत दिली माहिती
पीएम नरेंद्र मोदी (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्वीटरवर एक ट्वीट केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. कारण नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सोशल मीडिया सोडण्याचा विचार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, येत्या रविवारी (8 मार्च) फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि युट्युब सारख्या सोशल मीडियातून माघार घेण्याची शक्यता आहे. ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलोअर्स असून जगातील दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. मोदी यांचे ट्वीटरवर 53.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर फेसबुरवर 4 कोटी 47 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स, इन्स्टाग्रामवर 35.2 मिलियन फोलोअर्स आणि युट्युबर 4.5 मिलियन सब्सक्राईबर्स आहेत.

नरेंद्र मोदी यांनी यांनी सोशल मीडिया सोडण्याच्या विचारामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र मोदी नेमक्या कोणत्या कारणामुळे सोशल मीडियापासून दूर होणार हे गुलदस्त्यात आहे. मोदी यांच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की, सोशल मीडिया सोडू नका तर द्वेश सोडा असे ट्वीट केले आहे.(कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप बहुमताने सत्ता स्थापन करणार, अमित शहा यांचा ममता बॅनर्जी यांना इशारा)

यावर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सुद्धा त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांनी आता फक्त सोशल मीडिया सोडण्याचा विचार केला आहे. तर मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे त्यामुळे असा निर्णय घेण्याचा ते कसा विचार करु शकतात. दुसऱ्या बाजूला भाजपच्या आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी आपल्याला रविवार पर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे म्हटले आहे. मोदी यांनी जनतेला जोडण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला आहे. त्यामुळे मोदी यांचा सोशल मीडिया सोडण्याचा विचार आणि त्यामागील खरे कारण काय आहे हे कळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. तसेच आपणहून विविध तर्कवितर्क लावणे योग्य नाही आहे.