
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ज्या विमानाने प्रवास करतात ते आता वायुसेनेचे पायलट चालवणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगितले आहे की, एअर इंडिया कंपनीचे आता पायलट हे विमान उडवू शकणार नाहीत. भारतात पुढील वर्षात जुलै महिन्या दोन नवीन B-777 विमान येणार आहेत. सध्या B-747 विमान असून यामधून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती प्रवास करतात. मात्र आता दोन नवी विमाने आल्यानंतर ती वायुसेनेच्या पायलकडून चालवली जाणार आहेत. त्याचसोबत विमानाला नवी क्षेपणास्र लावण्यात येणार असून आपत्कालीन स्थितीत दुश्मनांचा सामना करु शकणार आहेत.
अमेरिकेची विमान निर्माती कंपनी बोइंग दोन नव्या विमानासह भारतात येणार आहेत. ही विमाने फक्त वायुसेनेचे पायलटच उडवणार असून त्यांना एअरइंडिया वन असे संबोधले जाणार आहे. वायुसेनेच्या पायलटांना एअरइंडियाने बी-777 कसे चालवायचे याची ट्रेनिंग दिली आहे. त्याचसोबत आता अन्य पायलटांना सुद्धा ट्रेनिंग दिली जाणार आहे. या विमानांमध्ये फक्त राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना प्रवास करता येणार आहे. तसेच विमानात एक वेगळी प्रेस कॉन्फेरन्स रुम, पेशेंट ट्रान्सपोर्ट युनिट आणि मेडिकल इमरजेंसी सुविधा उपलब्ध असणार आहे. नव्याने मोदींसाठी येणाऱ्या विमानानंतर एअरइंडिया कडून विमान घ्यावे लागणार नाही आहे. हे विमान खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या बजेट मध्ये अतिरिक्तपणे 4469.50 करोड रुपयांचा प्रस्ताव मांडला आहे.
बी-777 विमानात स्टेस ऑफ द आर्ट मिसाइल डिफेंस सिस्टिम लावण्यात आलेली असणार आहे. या क्षेपणास्राचे नाव लार्ज एअरक्राफ्ट इंफ्रारेड काइंटरमेजर्स (LAIRCM) असे आहे. तसेच स्वत:च्या बचावासाठी सुद्धा सुविधा दिली आहे. या दोन्ही डिफेंस सिस्टिमची किंमत जवळजवळ 1349 करोड रुपयाच्या आसपास आहे. या दोन्ही सुरक्षा प्रणाली अमेरिका राष्ट्रपतींच्या एअरफोर्स वन मध्ये ही लावण्यात आले आहे.(दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पहिलं 'Rafale' हे लढाऊ विमान फ्रान्सने केलं भारताला सुपूर्द; पहा Photo)
विमानावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास यामधून ग्रॅनेड हल्ला समोरच्यावर केला जाणार आहे. यामधील सर्व सिस्टम ऑटोमेटिकली सुरु होणार असून सेंसर्सच्या माध्यमातून एक अलार्म वाजला जाईल. त्यामधून क्षेपणास्र सिस्टमधून बाहेर आल्यानंतर हल्ला करणाऱ्याला धुडकावून लावणार आहे. त्याचसोबत पायलटा हल्लेखोराचे क्षेपणास्र उध्वस्त झाले आहे की नाही याची सुद्धा माहिती मिळणार आहे.