दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पहिलं 'Rafale' हे लढाऊ विमान फ्रान्सने केलं भारताला सुपूर्द; पहा Photo
Defence Minister Rajnath Singh (Photo Credits: Twitter)

भारतीय वायुसेनेसाठी आजचा दिवस खूपच ऐतिहासिक ठरला आहे कारण दसऱ्याच्या या शुभमुहूर्तावर आज भारताला आपलं पहिलं 'राफेल' हे लढाऊ विमान मिळालं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः जाऊन हे विमान फ्रान्सकडून भारताच्या ताब्यात घेतले व त्याची पूजाही केली.

राजनाथ सिंह राफेलच्या फॅक्टरीत पोहोचले व तेथील सर्व विमानांची पाहणी केली. नंतर भारताला मिळणाऱ्या राफेल विमानावर ओम काढून, व समोर नारळ ठेवून त्यांनी सर्वप्रथम पूजा केली.

पहा फोटो

राफेल या लढाऊ विमानामुळे भारतीय वायुसेनेची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे कारण हवेतून हवेत मारा करण्याची खासियत या विमानामध्ये आहे.

भारत आणि फ्रान्समध्ये सप्टेंबर 2016 मध्ये 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता आणि या सर्व विमानांची किंमत 7.87 बिलियन यूरो इतकी निश्चित करण्यात आली होती.

राफेलची काही वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी खालील लिंकला जरूर भेट द्या

जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट?