आंतरराष्ट्रीय मासिक टाईम (Time) यांच्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो झळकला आहे. मात्र फोटोच्या बाजूला मोदी म्हणजे 'India's Divider In Chief' असे लिहिण्यात आले आहे. यामुळे गदारोळ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
या मासिकात मोदी यांच्या गेल्या 5 वर्षाच्या कामकाजावर टिप्पणी करण्यात आली असून जवाहरलाल नेहरु यांचा समाजवाद आणि भारतामधील सध्याच्या सामाजिक स्थितीची तुलना केली आहे. त्याचसोबत मोदी हे सत्तेत असल्यामुळे धार्मिक राष्ट्रवाद. मुस्लिमांच्या विरोधातील भावना आणि जातीयवादी हे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे लेखात उल्लेख केला आहे. तसेच 1984 मधील शिख यांच्या विरोधातील दंगलीसह 2002 मधील गुजरात दंगलीबद्दल सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकरणातील गोलंदाजीमुळे विरोधी पक्षांची दांडी गुल, भाजपचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल Video)
TIME’s new international cover: Can the world’s largest democracy endure another five years of a Modi government? https://t.co/oIbmacH9MS pic.twitter.com/IqJFeEaaNW
— TIME (@TIME) May 9, 2019
लोकसभा निवडणूकीवर आशियाच्या आवृत्तीत टाईमकडून हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच पुढील पाच वर्षे देशाची सत्ता मोदी यांच्या हातात देणार का असे सुद्धा लिहिण्यात आले आहे. तर येत्या 23 मे रोजी लागणाऱ्या निवडणूकीच्या निकालानंतर मोदींना पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.