ओम बिरला यांची 17 व्या  लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Om Birla (Photo Credits: ANI)

भाजपा नेते आणि राजस्थान कोटा येथील खासदार ओम बिरला (Om Birla) यांची आज 17 व्या लोकसभेमध्ये अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी लोकसभेमध्ये पदभार स्वीकारला आहे. लोकसभेत ओम बिरला यांच्या कार्याची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी करून दिली आहे. ओम बिरला यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.

ANI Tweet

कोण आहेत ओम बिरला?

राजस्थान येथील कोटा लोकसभा मतदार संघातून ओम बिरला सलग दुसर्‍यांदा निवडून आले आहेत.

57 वर्षीय ओम बिरला हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसोबत होते. विद्यार्थी दशेपासून ते राजकारणामध्ये सक्रीय होते.

खासदार म्हणून सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले आणि लोकसभेचे सभापती पद भूषवणारे हे पाचवे खासदार आहेत.

बिरला यांनी 12 वी, 13 वी आणि 14 वी राजस्थान विधानसभा साठी 2003, 2008, 2013

साली आमदार होते. त्यानंतर 2014 साली खासदार आहेत.

ओम बिरला यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कॉंग्रेसच्या रामनारायण मीणा यांचा 2.79 लाखांनी पराभव केला.