Subramanian Swamy. (Photo Credits: ANI/File)

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करावी अशी मागणी आता सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी केली आहे. यापूर्वी सुद्धा गांधीजीबाबात वादग्रस्त विधान करण्यात आली होती. त्यानंतर आता सुब्रमण्यम स्वामी  यांनी नथुराम गोडसे यांनी गांधीजींवर गोळ्या झाडून हत्या केल्याचे विधान केले आहे. तसेच गांधीजींच्या हत्येनंतर त्यांचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही असा सवाल सुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला आहे. गांधीजींच्या हत्येसंबंधित काही प्रश्न उपस्थित करत हत्येचा तपास करावा असे म्हटले आहे. भाजप नेत्याने काही प्रत्यक्षदर्शियांच्या हवाल्याने असा दावा केला आहे की, गोळी मारल्यानंतर ते जवळजवळ 35 मिनिटे जीवंत होते.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, एपीच्या आंतरराष्ट्रीय पत्रकाराने संध्याकाळी 5.05 वाजता 4 गोळ्या चालवण्यात आल्याचा आवाज ऐकला होता. तर कोर्टात सरकारी वकिलांनी म्हटले की नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. तर एपीआय पत्रकाराने सांगितले की, महात्मा गांधी यांना बिरला हाऊसमध्ये 5.40 वाजता मृत घोषित करण्यात आले. गांधीजींच्या हत्येप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी तीन प्रश्न सुद्धा विचारले आहेत.(वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या 63 फुटी पुतळ्याचे अनावरण)

दरम्यान, 30 जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसे यांनी दिल्लीतील बिरला भवनात महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना झाली त्यावेळी महात्मा गांधी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते.