PM Narendra Modi Inaugarates Deendayal Upadhyaya Statue In Varanasi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी आज वाराणसी (Varanasi)  दौऱ्याच्या दरम्यान दिवंगत माजी भारतीय जन संघ नेते दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyay) यांच्या 63 फुटी पुतळ्याचे अनावरण केले. या सोहळ्यानंतर त्यांनी कर्नाटक (Karnatak) , महाराष्ट्र (Maharashtra) आणि तमिळनाडू (Tamilnadu) हून आलेल्या लोकांना आणि संतांना संबोधित करताना त्यांनी मराठी , तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. तसेच यावेळी वाराणसीला त्यांनी तब्बल 1200 कोटी रुपयांच्या योजनांची भेटही दिली. दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा हा येत्या पिढीपर्यंत त्यांची ओळख पुढे नेण्यासाठी तसेच राष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा दोन्ही मार्गानी महत्वपूर्ण असणार आहे असे देखील मोदी आपल्या भाषणात म्हणाले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये जेवणाच्या थाळीवरून राजकारण; शिवभोजन थाळीनंतर BJP ने सुरु केली 30 रुपयांत 'दीनदयाळ थाळी'

प्राप्त माहितीनुसार, चंदौलीच्या पडावमध्ये मोदींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 63 फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण केलं असून जनसंघाच्या संस्थापकांपैंकी एक असलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ इथेच एक उपवन देखील साकारण्यात आले आहे. दरम्यान, मोदींनी आपल्या भाषणात पर्यटनाच्या विकास मुद्द्याला हात घालत, "आपण देशात 5  ट्रिलियन अर्थव्यवस्था साकारण्याचे स्वप्न पाहत आहोत यामध्ये पर्यटनाचा मोठा वाट असणार आहे, मात्र नैसर्गिक पर्यटनाच्या सोबतच भारतात ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळांना देखील मोठ्याप्रमाणात पर्यटक भेट देत असतात, याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयी उभारणे हे आपले उद्दिष्ट आहे असे सांगितले आहे.

ANI ट्विट

दरम्यान वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिंकलेला मतदारसंघ आहेत उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा वर्षांतला पंतप्रधान मोदींचा हा 22 वा वाराणसी दौरा आहे. आज याच ठिकाणी येऊन मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस वाराणसी ते इंदौर अशी धावेल.