Former Speaker of Legislative Council Shivajirao Deshmukh | (File Photo)

Maharashtra Legislative Council Bye-Elections 2019:  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी मतदान पार पडणार आहे. विधानपरिषद माजी सभापती आणि काँग्रेस सदस्य शिवाजीराव देशमुख (Former Speaker of Legislative Council Shivajirao Deshmukh) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या एकूण 288 सदस्यांपैकी विद्यमान स्थितीत भाजपा (BJP) 122, तर शिवसेना (Congress)63 आमदार आहेत. काँग्रेस (Congress) 42, तर राष्ट्रवादी (NCP) 41 आमदार आहेत. सोबतच सात अपक्ष आणि इतर छोटे पक्षांचे 13 आमदार आहेत.

विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करतात. विधान सभेतील संख्याबळ पाहता या पोटनिवडणुकीत शिवसेना - भाजप युतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

संख्याबळाचा विचार करता ही पोटनिवडणूक जिंकणे शिवसेना-भाजप आणि महायुतीसाठी मोठी अवघड गोष्ट असणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या इतर घटक पक्षांनी एकत्र येत जरी उमेदवार दिला तरीही युतीची ताकद अधिक आहे असे दिसते. (हेही वाचा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्यानंतर हे पद कोणाला मिळणार? राहुल गांधी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता )

विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

शेकाप - 03

बविआ - 03

एमआयएम - 02

मनसे - 01

सप - 01

भारिप - 01

माकप - 01

रासप - 01

अपक्ष - 07

एकूण - 288

14 जानेवारी 2019 रोजी विधान परिषद आमदार शिवाजीराव देशमुख यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं. या जागेचा कार्यकाळ 24 एप्रिल 2020 रोजी समाप्त होत आहे. या जागेवर निवडूण येणाऱ्या सदस्यास केवळ 11 महिनेच काम करण्याची संधी आहे. तरीही या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी कोणकोण उमेदवार रिंगणात उतरतायत याबाबत उत्सुकता आहे.