राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्यानंतर हे पद कोणाला मिळणार? राहुल गांधी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता 
राधाकृष्ण विखे पाटील- राहुल गांधी (Photo Credits-File Images)

काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा पदश्रेष्ठींकडे सोपवला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विखे-पाटील यांनी दिलेला राजीनामा स्विकाराला होता.

मात्र आता पक्षात रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान कोणाला द्यायचा याबद्दल लवकरच राहुल गांधी निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता सर्व जणांचे राहुल गांधी या पदावर कोणाची नेमणूक करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.(अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा, अशोक चव्हाण यांनी दिली माहिती)

तत्पूर्वी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु विखे यांनी पक्ष देऊ करेल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे म्हटले होते. अखेर विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.