अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा, अशोक चव्हाण यांनी दिली माहिती
राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुत्र सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा दिला होता. यावर अखेर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तो स्विकारला असून आता राधा कृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला असल्याची अधिक माहिती अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तर बुधवारी शिर्डी येथे झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आपले मत गुरुवारी स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.(राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या बातम्या या अफवा, ते कॉंग्रेसमध्येच राहणार: सुजय विखे-पाटील)

तसेच विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी आपले पुत्र सुजय विखे यांच्यासाठी आग्रही होते. याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे शब्दसुद्धा विखे पाटील यांनी टाकला होता. तर काँग्रेस स्टार प्रचारकांमध्ये विखे पाटील यांच्या नावाचा समावेश असूनही त्यांनी पक्षाचा प्रचार केला नाही. त्यामुळे हायकमांड कोणती भुमिका घेणार याबद्दल अशोक चव्हाण यांनी काल स्पष्ट केले होते.