PM Narendra Modi | | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रात अखेर सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून पुन्हा एका पुढील पाच वर्षांसांठी देवेंद्र फडवणवीस यांचे सरकार दिसून येणार आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची कमान स्विकारली आहे. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाची सत्ता समिकरण पाहता ही राजकरणातील एक मोठी खळबळ असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार सत्ता स्थापनेसाठी आले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पुढील पाच वर्ष हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित काम करतील अशी अशा व्यक्त केली आहे.(Maharashtra Government Formation Live Updates: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चेत शरद पवार सुद्धा सहभागी- सूत्र)

नरेंद्र मोदी ट्वीट:

शुक्रवारी नेहरु सेंटरमध्ये महाशिवआघाडीची सत्ता राज्यात येईल असा दावा करण्यात आला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब सुद्धा झाले. मात्र शनिवारी सकाळी राजभवनातून सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याची बातमी कळल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच शरद पवार यांच्या निवासस्थानी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवार या सत्ता स्थापनेच्या तिढ्याबबात काय बोलणार हे पहाणे महत्वपूर्ण ठरणार आहे.