Madhya Pradesh Assembly Elections Results 2018: मध्य प्रदेश कोणाचे? फैसला सुरु
Rajasthan Assembly Assembly Elections 2018 | (Photo courtesy: Archived, edited and representative images)

Madhya Pradesh Assembly Elections Results 2018: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकासाठी (Assembly Elections) झालेल्या मतदानासाची आज (11 डिसेंबर) मतमोजणी होत आहे. एकूण 230 जागांसाठी 28 डिसेंबरला मतदान झाले. सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणी सुरुवात झाली आहे. काही वेळात जनतेचा कौल काय आहे याचा प्राथमिक कल हाती येईल. दरम्यान, मदमोजणीसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) जय्यद तयारी केली आहे. दरम्यान, प्रमुख सामना भाजप आणि काँग्रेस यांच्यात पाहायाला मिळत आहे.

मध्यप्रदेश विधानसभेसाठी एकूण मतदारसंख्या 5,04,95,251 इतकी आहे. त्यापैकी 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला मतदार आहेत. तर, 1,389 थर्ड जेंडर मदतार आहेत. एकूण मतदारांपैकी निवडणूक प्रक्रियेसाठी कर्तव्यवावर असलेल्या 65,000 मतदारांनी पोस्टाद्वारे मतदान केले आहे. उर्वरीत 5,04,33,079 मतदार मतदानाचा हक्क आज बजावत आहेत. या निवडणुकीसाठी 1,094 अपक्ष उमेदवारांसह एकूण 2,899 उमेदवार मैदानात आहेत. ज्यात 2,644 पुरूष, 250 महिला तर ५ ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे. (हेही वाचा, Assembly Elections Results 2018: मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम विधानसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य प्रदेश एक्झिट पोल अंदाज

मध्यप्रदेशमध्ये एकूण 230 जागांपैकी ABPने वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपला 94, काँग्रेसला 126 तर इतर पक्षांना 10 जागा मिळतील असे म्हटले आहे.

Republic TVने वर्तवलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला 89 ते 115, भाजपला 108 ते 128 इतरांना 25 जागा मिळती असे म्हटले आहे.

Times Now ने वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपला 89 भाजपला 126 तर इतर राजकीय पक्षांना 15 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

India News ने वर्तवलेल्या अंदाजानुसार काँग्रेसला 112 जागा भाजपला 106 तर, इतर राजकीय पक्षांना 12 जागा मिळतील असे म्हटले आहे.

India Todayने वर्तवलेल्या अंदाजानुसार काँग्रेसला 104 ते 122 जागा, भाजपला 102 ते 120 जागा मिळू शकतील तर, इतर राजकीय पक्षांना 4 ते 11 जागा मिळतील असे म्हटले आहे.