Assembly Elections Results 2018: पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपवर 5-0ने आघाडी, सत्तापरिवर्तनाचे संकेत
वोटिंग मशीन (File Photo)

Assembly Elections Results 2018 :  मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana), छत्तीसगड (Chhattisgarh) , मिझोराम (Mizoram ) या राज्यंसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुक (Assembly Elections)  मतदानाची मतमोजणी आज (मंगळवार, 11 डिसेंबर) पार पडत आहे. अपेक्षेप्रमाणे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे. यात पाचही राज्यांमध्ये काँग्रेस आगाडीवर असून, भाजप मोठ्या फरकाने मागे पडताना दिसत आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh)

प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 जागांपैकी 144 जागांचे प्राथमिक कल हाती येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस 80 भाजप 74 तर इतर पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहेत.

राजस्थान (Rajasthan)

राजस्थानमध्ये 199 जागांसाठी काँग्रेस 78 जागेवर आघडीवर आहे तर भाजप 61 जागांवर आघडीवर आहे. इतर पक्ष 8 ठिकाणी आघडीवर आहेत.

तेलंगणा (Telangana)

तेलंगणामध्ये 119 जगांपैकी टीआरएस 40, कांग्रेस+टीडीपी 37 जागांवर आघाडी आहेत. तर, भाजप 06 इतर 08 जगांवर आघाडीवर आहेत.

छत्तीसगढ (Chhattisgarh)

छत्तीसगढमध्ये एकूण 90 जागांसाठी काँग्रेस 57, भाजप 26 तर इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहेत