कमलनाथ (फोटो सौजन्य- ANI)

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) तब्बल पंधरा वर्षांनी काँग्रेसने आपली सत्ता मिळवली आहे. तर आज अखेर काँग्रेस नेतृत्वाने कमलनाथ (Kamal Nath)यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या वेळी काँग्रेसकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण भोपाळभर काँग्रेसने पोस्टर्स झळकावली होती.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अवघ्या अडीच तासांमध्ये कमलनाथ यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांनी स्वाक्षऱ्या करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ( हेही वाचा- दोस्तीचे पक्के कमलनाथ; राहुल गांधी यांच्या सोबतच संजय गांधी यांनाही दिले पोस्टरवर स्थान)

तर विधानसभा निवडणूकीपूर्वी प्रचार सभेमध्ये कमलनाथ यांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण कर्जमाफी करु असे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन आज कमलनाथ यांनी पूर्ण केले असून मुख्यमंत्री पदाच्या कारभाराची सुरुवात या गोष्टीपासून सुरु करण्यास सुरुवात केली आहे.