उत्तर प्रदेश विधानसभा (फोटो सौजन्य- ANI)

उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) मंगळवार (5 फेब्रुवारी) पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) मधील आमदारांनी विधानसभेत सरकार विरुद्ध घोषणा करण्यास सुरुवात केली. तर राज्यपाल रामनाईक यांचे आज अभिभाषण होते. मात्र आमदारांनी रामनाईक यांच्यावर भरलेल्या विधानसभेत चक्क त्यांच्या अंगावर कागदाचे गोळे फेकल्याचा विचित्र प्रकार पाहायला मिळाला.

बिहार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सुद्धा राज्यपालांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर एसपी पक्षाचे आमदार  त्यांच्यावर कागदांचे गोळे फेकून मारु लागले.परंतु ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. यावरुन तेथील लोक कोणत्या पद्धतीचे काम करतात याचा अंदाजा येतो.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विधानसभेत सुरुवात झाली. त्यावेळी राज्यपाल दोन्ही पक्षातील आमदारांना संबोधित करत होते. त्याचवेळी अचानक एसपी आणि बीएसपी पक्षाच्या आमदारांनी हंगामा करण्यास सुरुवात केली. योगी सरकार पुढच्या आर्थिक वर्षासाठी 7 फेब्रुवारी रोजी आपले अर्थसंकल्प सादर करणार आहे. तर सत्र 22 फेब्रुवारी पासून चालणे अपक्षित असून योगी सरकारचे हे तिसरे अर्थसंकल्प असणार आहे.

तर यावेळी रामनाईक यांच्यावर बोळे फेकण्यात आले. हा गोंधळ सुरू असताना सपाचे सुभाष पासी नावाचे आमदार बेशुद्ध झाले.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिनेच उरले आहेत. त्यात यंदाचे अर्थसंकल्प सामान्य नागरिकांना दिलासा देईल अशी शक्यता आहे.