Lok Sabha Election Results 2019: 'जनता मालिक हैं' म्हणत राहुल गांधी यांनी दिल्या पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा; काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाची चर्चा
Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

Lok Sabha Election Results 2019:  लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modiji) आणि स्मृती ईराणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, 'जनता मालीक हैं' असे म्हणत जनमताचा कौलही स्वीकारला आहे. देशात आणि अमेटीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी राहुल गांधी बोलत होते.

देशातील आणि अमेठी मतदारसंघातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी म्हणाले, 'जनता मालक आहे. जनतेने आज आपला निर्णय दिला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतो. तसेच, काँग्रेस पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी निवडणूक लढवली, प्रचार केला त्या सर्वांचे मी आभार मानतो', असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश येथील अमेठी येथील जागेवरुन झालेला पराभव स्वीकारला आहे. स्मृती ईराणी अमेठी येथून जिंकल्या आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा मी फक्त त्यांना इतकेच सांगेण की त्यांनी अमेठीच्या जनतेची काळजी घ्यावी. दिलेली स्वप्नं पूर्ण करावीत. (हे ही वाचा, Lok Sabha Election Results 2019: वायनाडच्या विजयाने राहुल गांधी यांचा नवा रेकॉर्ड; देशाच्या इतिहासात सर्वाधील मतांनी विजयी ठरलेले उमेदवार)

झालेल्या पराभवाची मी 100 टक्के जबाबदारी घेत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. राहुल यांनी हा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेसकढून मात्र या चर्चेबाबत पुष्टी होऊ शकली नाही. तसेच, काँग्रेसनेही याबाब अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.