 
                                                                 सध्या रमजानचा (Ramadan) महिना सुरु आहे. तसेच देशभरात लोकसभा निवडणूकाचे (Lok Sabha Elections) वातावरण सुद्धा आहे. याच पार्श्वभुमीवर रमजानच्या महिन्यात मतदान पहाटे पाच वाजता घेण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ही याचिका फेटाळून लावली असून मतदान पहाटे पार पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मतदान नेहमीप्रमाणे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. तसेच सकाळी सात वाजता अधिक तापमान नसल्याचे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तर वकील निजामुद्दीन पाशा यांनी ही याचिका दाखल केली होती. यापूर्वीच निवडणूक आयोगाने या मागणीला नकार दिला होता. त्यामुळे निजामुद्दीन पाशा यांनी हा याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.(Lok Sabha Elections 2019: रमजान वेळी मतदानाची वेळ बदलण्यात येणार नाही - निवडणुक आयोग)
6 मे पासून रमजानचा महिना सुरु झाला असून मुस्लिम बांधव यावेळी रोजा ठेवतात. त्यामुळे पाचव्या ते सातव्या टप्प्यातील मतदानावेळी तापमान पाच डिग्रीपर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यामुळे आता मतदान सकाळी सात वाजताच होणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
