Lok Sabha Elections 2019: रमजान वेळी मतदानाची वेळ बदलण्यात येणार नाही - निवडणुक आयोग
Image used for representational purpose | File Image

रमजानच्या (Ramzan) वेळी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) होणाऱ्या मतदानाची वेळ बदलण्यात येणार नसल्याचे निवडणुक आयोगाने (Election Commission) स्पष्ट केले आहे. तर सातपैकी तीन टप्प्यातील मतदान रमजानच्या वेळी पार पडणार आहे. त्यामुळे मतदानासाठी वेळ 7 ऐवजी पहाटे 4. 30 वाजता करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाबद्दल निवडणूक आयोगाकडे याची जबाबदारी सोपविली होती.

तर निवडणुक आयोगाने रमजानच्या वेळी ममतदानासाठी वेळ बदलणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर अधिवक्ता मोहम्मद निजामुद्दीन पाशी आणि असद हयात यांनी याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच देशात उष्णतेचा वाढता पारा पाहता वेळ बदलण्यात यावी असे सुद्धा याचिकेमध्ये म्हटले होते.(Loksabha Elections 2019:'रमजान'च्या महिन्यात पहाटे 5 ला मतदान करण्याबाबत सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला विचारणा)

त्यामुळे रमजानच्या वेळी ठेवण्यात आलेला उपवासामुळे मतदारांना घराबाहेर पडणे थोडे अशक्य होईल. त्याचसोबत सकाळी नमाज आि सहेरीनंतर उपवास करणारे मुस्लिम बांधव आराम करतात असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.