EVM-VVPT वरुन विरोधी पक्ष पुन्हा सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव
EVM-VVPT Issue (Photo Credits-ANI)

नवी दिल्ली (New Delhi) येथे रविवारी विरोधी पक्षांची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (EVM) मुद्द्यावरुन बैठक पार पडली. त्यावेळी ईव्हीएमवरुन होणाऱ्या गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तर 50 टक्के पेपर ट्रेलची ईव्हीएम सोबत पडताळणी करण्याच्या मागणीवरुन पुन्हा एकदा विरोधी पक्ष सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चंद्रबाबु नायडू यांनी शनिवारी निवडणुक आयुक्त यांची भेट घेऊन ईव्हीएमबद्दल मुद्दा उपस्थित केला होता. तर 21 राजकीय पक्षांनी 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच व्हीव्हीपॅट (VVPT) मुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे हे कळते. व्हीव्हीपॅटवर डिसप्ले सात सेकंदाऐवजी फक्त तीन सेकंदासाठी दिसतो असे काँग्रेस पक्षाचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. (Lok Sabha Elections 2019: EVM मध्ये बिघाड असल्याच्या संताप, आंध्र प्रदेशातील आमदाराने मशीन जमिनीवर फेकली (Video)

परंतु निवडणुक आयोगाकडून पारदर्शकतेबद्दल मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आता धाव घ्यायला हवी असे सिंघवी यांनी म्हटले आहे. तसेच मतमोजणीसाठी संख्या वाढवा असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.