Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. तत्पूर्वी कर्नाटक येथील कुमारस्वामी (Kumaraswamy) यांच्या सरकारमधील मंत्री सीएस पुट्टाराजू (CS Puttaraju) यांच्या घरावर आयकर विभाकाडून छापे टाकण्यात आले आहेत. तसेच मंड्या, हसन आणि म्हैसुर येथील ठिकाणांवर छापेमारी केली असून बांधकाम विभाग, सिंचन विभागासह अन्य 7 अधिकाऱ्यांच्या घरावर छापे मारले आहेत. तर केंद्र सरकारने छापेमारीसाठी सीआरपीएफचे जवान तैनात केले असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला होता.
पुट्टाराजू हे कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारमध्ये सिंचन मंत्री पद सांभाळतात. तसेच कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकारी आणि जवानांनी मंड्या येथील घर आणि म्हैसुर येथील पुट्टाराजू यांच्या भाच्याच्या घरावर छापेमारी केली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश)
ANI ट्वीट:
Karnataka: Income-Tax raids are underway at residence of JD(S) leader & Karnataka Minor Irrigation Minister CS Puttaraju in Mandya pic.twitter.com/BrEX9LBnOa
— ANI (@ANI) March 28, 2019
तर एक दिवसापूर्वी कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि जेडीएस पदाधिकाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने धाड टाकत पुट्टाराजू यांच्यावर कारवाई केली आहे.