Lok Sabha Elections 2019: 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Bollywood Actress Urmila Matondkar Joins Congress Bollywood Actress Urmila Matondkar Joins Congress | (Photo Credits: ANI)

Lok Sabha Elections 2019: 'छम्मा छ्म्मा', 'रंगीला गर्ल' म्हणून बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आज (बुधवार, 27 मार्च) काँग्रेस ( Congress) पक्षात प्रवेश करत राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. लोकसभा निवडणुकीचे वारे देशात वाहात असतानाच मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय प्रवाहासोबत स्वत:ला जोडून घेतले (Urmila Matondkar Joins Congress, Breaking). उर्मिला मातोंडकर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha constituency) काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवू शकतात.

माझ्या घरात काँग्रेसी मुल्यांची शिकवण सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे माझ्यावरही कॉंग्रेसी मुल्यांचा प्रभाव आहे. मधला बराच काळ मी अभिनय क्षेत्रात राहीले. त्यामुळे काँग्रेसपासून काहीशी दूर गेले. आता मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असे मातोंडकर यांनी सांगितले. तसेच, माझा काँग्रेस प्रवेश केवळ निवडणुकीच्या काळापूरता असणार नाही. तर, पक्ष सत्तेत असला किंवा नसला तरीसुद्धा मी माझा प्रवास काँग्रेससोबतच ठेवेन, असेही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

जेव्हा एखादा कलाकार राजकारणात प्रवेश करतो तेव्हा, केवळ गर्दी जमविण्यासाठी किंवा एक चर्चेतील चेहरा म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. परंतू, तुम्ही माझ्याबाबत विचार करताना काहीसे हा विचार बाजूला करा. कारण, मी लहानपणापासूनच काँग्रेस मुल्यांना मानत आली आहे. केवळ निवडणूक आहे, म्हणून मी काँग्रेसमध्ये आले आहे, असे नाही, असेही उर्मिला मातोंडकर यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा,Lok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्षप्रवेशासाठी 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल (Photo) )

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार, सकाळी 11 वाजता उर्मिला मातोंडकर दिल्लीला पोहोचल्या. त्यानंतर त्यांची भेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते मलींद देवरा, संजय निरुपम, आमदार अस्लम शेख, जीएस भूषण पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.