Lok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्षप्रवेशासाठी 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल (Photo)
Umrila Matondkar (Photo Credits: Twitter)

'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर (Umrila Matondkar) काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्यासाठी ती दिल्लीला रवाना झाली आहे. दिल्ली एअरपोर्टवरील तिचा फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोत उर्मिला सोबत काँग्रेस कार्यकर्ते संजय निरुपम दिसत आहेत. आज दुपारी दीड वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत उर्मिला पक्षप्रवेश करेल.

पहा फोटो:

पक्षप्रवेशानंतर उर्मिलाला उत्तर मुंबईतून निवडणूकीची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. असे झाल्यास उत्तर मुंबईतील भाजपचे गोपाळ शेट्टी या तगड्या उमेदवाराविरुद्ध उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवेल.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रेटींची नावे विविध पक्षांची जोडली जात आहेत. त्यात सलमान खान, संजय दत्त, सनी देओल या सेलिब्रेटींची नावे पुढे आली आहेत. त्यापैकी काही नावे या निव्वळ अफवा असून काही चर्चेतील नावे पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.