पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मतदानापूर्वी अहमदाबाद (Ahmedabad) येथे 'रोड शो' चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निवडणुक आयोगाच्या (Election Commission) नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) पक्षाकडून करण्यात आला. त्यानंतर निवडणुक आयोगाने मोदी यांच्याकडून रोड शो संदर्भातील अहवाल सादर करावा असा आदेश दिला आहे.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काल (23 एप्रिल) तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्यापूर्वी रोड शोच्या माध्यमातून जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु पंतप्रधानांनी निवडणुक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे एका आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप या बद्दल कोणतीही अधिकृत भुमिका आयोगाने जाहीर केली नाही.(हेही वाचा-अभिनेता सनी देओल यांनी केला भाजप प्रवेश)

गुजरात मधील मुख्य निवडणुक आयोगाकडून मोदी यांच्या रोड शो संदर्भातील अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये 'मोदीजी की वायुसेना' असे विधान केले होते. त्यासंदर्भात सुद्धा सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे.