Lok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा चर्चा करुन जाहीर, तर भाजपचा जाहीरनाम्याचा विचार बंद खोलीत - राहुल गांधी
Rahul Gandhi And Narendra Modi (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला येत्या दिवसात सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने 2 एप्रिल रोजी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर सोमवारी (8 एप्रिल) भाजप (BJP) पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातून येत्या पाच वर्षात दोन्ही पक्ष त्यांचे देशासाठी काय लक्ष असणार आहे हे त्यांनी यामधून सांगितले आहे. तसेच राहुल गांधी यांनी ट्वीट करत काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या जाहीरनाम्यात काय फरक आहे याबद्दल सांगितले आहे.

सत्तेत असलेल्या मोदी सरकारने त्यांचा 'संकल्पपत्र' नावाने जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला. परंतु काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप पक्षाच्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेतला आहे. तर भाजप पक्षाने त्यांचा जाहीरनामा बद्दलचा निर्णय बंद खोलीत घेतला असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपचा दृष्टीकोन लहान आणि गर्विष्ठ पद्धतीचा असल्याची टीकासुद्धा राहुल गांधी यांनी केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा देशातील जनेतच्या दृष्टीकोनातून विचार-चर्चा करुन घेतला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-BJP Manifesto 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपाचा जाहीरनामा 'संकल्पपत्र' म्हणून जाहीर; राम मंदीर, शेतकरी पेन्शनसह तरूणांना खूष करण्यासाठी 75 संकल्पांची घोषणा)

या दोन्ही पक्षांनी विविध क्षेत्रांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा लेखाजोगा मांडला आहे. तर काँग्रेस पक्षाने न्याय योजनेचा महत्वाचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात मांडला असून गरिबांना 72 हजार रुपये वर्षाला मिळणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.