BJP Manifesto 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपाचा जाहीरनामा 'संकल्पपत्र' म्हणून जाहीर; राम मंदीर, शेतकरी पेन्शनसह तरूणांना खूष करण्यासाठी 75 संकल्पांची घोषणा
BJP Manifesto 2019 | Sankalp Patra (Photo Credits: Twitter)

BJP Sankalp Patra 2019: 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणूक 2019 साठीचा जाहीर केला आहे. हा भाजपाचा 'संकल्पपत्र' म्हणून नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 75 संकल्पांचा समावेश आहे. नव्या भारतासाठी हे संकल्पपत्र कटीबद्ध असेल असे सांगण्यात आले आहे. संकल्पित भारत सशक्त भारत असा नारा भाजपाने दिला आहे.  Lok Sabha Elections 2019: ‘फिर एक बार मोदी सरकार’, जुन्यात थोडा नवा बदल करत भाजपकडून टॅगलाईनची घोषणा; प्रचार गीत लॉन्च

भाजपाच्या संकल्पपत्र 2019 मध्ये काय असेल? 

  • दहशतवादाविरूद्ध झिरो टॉलरंस पॉलिसी,घुसखोरी रोखणार राष्ट्राची सुरक्षा जपणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट असेल.
  • सिटीझनशीप अमेंटमेटं बिल दोन्ही सभागृहामध्ये जारी करू पण कोणत्याची राज्याची प्रतिष्ठा जपणार

    राम मंदिर लवकरच निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू

  • किसान सन्मान निधी मिळणार, 60 वर्षांनंतर शेतकर्‍यांना पेन्शन देणार, शेतकर्‍यांना 6 हजार रूपये प्रतिवर्षी मिळणार
  • राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार,व्यापारांनाही शेतकर्‍यांप्रमाणे पेंशन मिळणार
  • 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याजदर नाही.
  • प्रत्येक भारतीयांसाठी पक्कं घर मिळेल, 100% विद्युतीकरण करण्याचं उद्दिष्ट असेल.
  • स्वच्छ पाणी, शौचालय प्रत्येक घराघरात असेल यासाठी प्रयत्न केले जातील.
  • 2022 पर्यंत सारे रेल्वे मार्ग विद्युतीकरण पूर्ण केले जाईल.नवी इंजिनिअरिंग़, लॉ आणि मेडिकल कॉलेज सुरू केली जाणार आहेत. येथे पहा भाजपाचं संपूर्ण संकल्पपत्र 2019

2022 पर्यंत नव्या भारतासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. भाजपाच्या संकल्पपत्र 2019 चं अनावरण प्रसंगी अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरूण जेटली उपस्थित होते. दिल्लीच्या भाजपा कार्यालयात याची घोषणा करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मतदार संघातून लढवणार आहेत.