Lok Sabha Elections 2019: अरुणाचल प्रदेश येथे जनेतला पैसे देऊन भाजपचा मत विकत घेण्याचा प्रयत्न, काँग्रेस पक्षाचा आरोप
Randeep Surjewala (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) येथे जनतेला पैसे देऊन त्यांची मते विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ता रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी भाजप (BJP) पक्षावर केला आहे. दिल्ली येथील एका पत्रकार परिषदेच्यावेळी त्यांनी हे वक्तव केले आहे. यावेळी पैसे जप्त करत कारवाई केल्याचा व्हिडिओ त्यांनी मीडियासमोर दाखवला.

तसेच राज्याचे मुख्यंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांच्याकडून 1.8 कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजप पक्ष जनतेत हे पैसे वाटून त्यांची मते विकत घेत असल्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा कशासाठी एवढा पैसा त्यांनी बाळगला असल्याचे विविध प्रश्न विचारले जात आहेत. तसेच निवडणुक आयोगाने या प्रकरणी कारवाई का केली नाही असा प्रश्न काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. यामध्ये पेमा खांडू यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष यांचा हात असल्याचे समोर आले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: 'गरीबी पर वार, 72 हजार' म्हणत राहुल गांधी यांनी सादर केला काँग्रेसचा जाहीरनामा)

ज्या दिवशी पेमा खांडू यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशात दौऱ्यासाठी येणार होते. तर निवडणुक आयोगामधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पैसे जप्त करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.